शिर्डी / अहमदनगरअमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने घरोघरी तिरंगा उपक्रम ( Indian Independence Day ) राबवण्यात येत आहे़. त्याचबरोबर जागतिक ओळख ( Azadi ka Amrit Mahotsav ) असलेल्या साईनगरीत विविध धर्मियांच्या सहयोगातून हर मंदिर मज्जिद पर तिरंगा हा ( Sainagari Har Mandir Masjid Tiranga ) अभिनव उपक्रम राबवण्यात येणार असल्याच शिर्डीत झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले आहे.
बैठकीला मान्यवर उपस्थित शिर्डी नगरपंचायतमध्ये या संदर्भात झालेल्या बैठकीला कार्यालयीन अधीक्षक बाळासाहेब पारधी ( Balasaheb Pardhi ), मुख्यलिपिक रावसाहेब जावळे ( Chief Clerk Raosaheb Jawle ), जामा मज्जिद ट्रस्टचे अध्यक्ष शमशुद्दीनभाई इनामदार ( Jama Majjid Trust Shamshuddinbhai Inamdar ), रज्जाकभाई शेख, शफिक शेख, अजिम शेख, अमिर बादशा शेख, जैन काच मंदिराचे सतीश गंगवाल, श्वेतांबर जैन मंदिराचे फुटरमल जैन, विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भास्करराव गोंदकर, दत्तात्रय लुटे, म्हळोबा मंदिराचे प्रकाश शिंदे, ऋषीकेश साळुंके, सावता मंदिराचे सुधीर शिंदे, कानिफनाथ मंदिराचे संजय सजन आदींची उपस्थिती होते.
साईनगरीतील प्रत्येक मंदिर व मशिदीवर तिरंगा फडकवण्याचा ऐतिहासिक निर्णय साईबाबांनी सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. त्यानुसार साईनगरीत आजही सर्वधर्मीय एकदिलाने व गुण्यागोविंदाने नांदतात़. एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होतात़. त्याच भावनेतून देशाभिमान व श्रद्धेचा ध्वज फडकवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हिंदू-मुस्लीम बांधवांनी सहर्ष सहमती दर्शवल्याचे मुख्याधिकारी डोईफोडे यांनी सांगितले़. साईबाबांनी जगाला सर्वधर्म समभावाची शिकवणूक दिली. त्याच तत्वानुसार येथील हिंदू- मुस्लिमांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने साईनगरीतील प्रत्येक मंदिर व मशिदीवर तिरंगा फडकवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
साईदरबारी स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव या निर्णयामुळे श्रद्धेला देशभक्ती व अभिमानाशी जोडले जाणार आहे. साईदरबारी स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवी क्षण अधिक संस्मरणीय करण्यासाठी साईसमाधी मंदिरावर तिरंगा फडकवण्याचा निर्णय साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी घेतला़. त्यापाठोपाठ शिर्डीतील हिंदू-मुस्लीम बांधवांनी शहरातील मंदिर-मशिदींवर तिरंगा उभारण्याचा निर्णय घेतला़. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यात येणार आहे़. याच काळात शिर्डीतील मंदिर व मज्जिदवरही तिरंगा लावण्यात येणार आहे.