अहमदनगर - आज सकाळी एका व्यक्तीने संगमनेर तहसील कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. हा प्रकार ध्वजारोहनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्यात परतत असताना घडला. हा प्रकार लक्षात येताच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजू गायकवाड यांनी त्याठीकाणी धाव घेत पेटलेल्या कदम यांच्यावर पाठी टाकून आग विझवली. कदम यांना तत्काळ पोलीस ठाण्याच्या सरकारी वाहनातून त्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते साठ टक्के भाजल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नगरच्या सामान्य शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
घराच्या जागेच्या वादातून आत्मदहनाचा प्रयत्न
एका व्यक्तीने संगमनेर तहसील कार्यालयाच्या आवारात रंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत संबंधीत व्यक्ती ६० टक्के भाजल्याने त्यांना नगरच्या समान्य शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अनिल शिवाजी कदम यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. मात्र, वारंवार तक्रार करूनही पोलीस दखल घेत नव्हते. भाडेकरू कडून अनिल शिवाजी कदम यांना वारंवार त्रास दिला जात होता. त्यामुळे त्यांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान झाले होते. न्याय मिळण्यासाठी त्यांनी प्रश्नाकडे निवेदने, तक्रारी अर्ज करून न्याय मिळण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासन दखल घेत नसल्याने आज सकाळी त्यांनी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व पोलीस कर्मचाऱ्यांनी कदम यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत अनिल कदम यांच्या मानेपासून गुडघ्यापर्यंतचा भाग व दोन्ही हातांना गंभीर इजा झाली असून त्यांना सुरुवातीला खासगी रुग्णालयात व नंतर नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.