महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gadakh Vs Murkute अहमदनगरमध्ये माजी मंत्री गडाख, माजी आमदार मुरकुटे गटात वाद, मुरकुटेंकडून हल्ल्याच्या प्रयत्नाचा दावा - Ex MLA Balasaheb Murkute

पुलाच्या उदघाटनावरून भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे Ex MLA Balasaheb Murkute यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप खुद्द मुरकुटे यांनी केला आहे. माजी मंत्री शंकरराव गडाख Ex Minister Shankarrao Gadakh गुंडांनी हा हल्ला केल्याचेही मुरकुटे यांनी म्हटले Attempted fatal attack on former BJP MLA आहे. Gadakh Vs Murkute

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Aug 17, 2022, 7:30 PM IST

Updated : Aug 17, 2022, 7:45 PM IST

अहमदनगरजिल्ह्यातील नेवासा येथील भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे Ex BJP MLA Balasaheb Murkute व माजी मंत्री शंकरराव गडाख Ex Minister Shankarrao Gadakh यांच्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी गडाख समर्थक व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यात वाद झाला. या वादातून मुरकुटे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप मुरकुटे समर्थकांनी केला Attempted fatal attack on former BJP MLA आहे. Gadakh Vs Murkute


नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील प्रवरा नदीवर पूल तयार करण्यात आला आहे. या पुलाचे उद्घाटन कार्यक्रम गडाख समर्थकांनी ठेवला होता. मात्र या पुलासाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या कार्यकाळात निधी आला. त्यातून हे काम झाले असे म्हणत बाळासाहेब मुरकुटे यांनी समर्थकांसह काळीफित लावून उद्घाटन कार्यक्रमाचा निषेध केला. तसेच पुलाच्या दुतर्फा उभे राहिले. त्यांचे निषेध आंदोलन पाहून गडाख समर्थक आक्रमक झाले.

अहमदनगरमध्ये माजी मंत्री गडाख, माजी आमदार मुरकुटे गटात वाद, मुरकुटेंकडून हल्ल्याच्या प्रयत्नाचा दावा

दोन्ही गटांत जोरदार घोषणाबाजी झाली. मुरकुटे समर्थकांकडून भाजपचा विजय असो, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा विजय असो, मुरकुटे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या. बाळासाहेब मुरकुटे यांनी नारळ फोडून पुलाच्या कामाचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला.

त्याच वेळी गडाख गटातील चार ते पाच जणांनी मुरकुटे यांना घेरून मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र मुरकुटे समर्थकांनी बाळासाहेब मुरकुटे यांना चारही बाजूंनी सुरक्षा कवच उभे केले. बाळासाहेब मुरकुटे यांनी समर्थकांसमोर पुलावर नारळ फोडून पुलाचे उद्घाटन केले. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव होता. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचाअहमदनगर हादरले मंत्री शंकरराव गडाखांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार

Last Updated : Aug 17, 2022, 7:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details