संगमनेर (अहमदनगर) Shirdi Congress President :शिर्डी काँग्रेस शहर अध्यक्ष सचिन चौघुले आणि नगरसेवक सुरेश आरने यांच्यावर काही अज्ञात इसमांनी लोणी येथे प्राणघातक हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. हे दोघं संगमनेर तालुक्यातील आश्वी येथून शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यावरून परतत होते.
रॉडनं बेदम मारहाण : संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे रिपब्लिकन नेते गायकवाड यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. या सोहळ्याला शरद पवार उपस्थित होते. या कार्यक्रमावरून परतत असताना ७-८ हल्लेखोरांनी सचिन चौघुले आणि सुरेश आरने यांची गाडी लोणी येथे अडवली. त्यांनी या दोघांवर प्राणघातक हल्ला करत रॉडनं बेदम मारहाण केली. या हल्ल्यात चौघुले यांच्या गाडीचंही मोठं नुकसान झालाय.