महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीत होम क्वारंटाईनचा शिक्का मारायला गेलेल्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की - ahmadnagar latest news

कोपरगावमध्ये होम क्वारंटाईनचा शिक्का मारायला गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

attack on lemployee who goes to stamp on home quarantine persons in kopargaon
शिर्डीत होम कॉरेंटाईनचा शिक्का मारायला गेलेल्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

By

Published : Mar 30, 2020, 11:03 PM IST

अहमदनगर -राज्यासह देशात कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. यामुळे बाहेरून आलेल्या नागरिकांच्या हातावर खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जात आहे. हा शिक्का मारण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड शिवारात समोर आला आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तीन बाप-लेकांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिर्डीत होम कॉरेंटाईनचा शिक्का मारायला गेलेल्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

कल्याण येथे नोकरीला असलेला आरोपी लक्ष्मीकात कारभारी विधे हा बाहेरुन आल्याची तक्रार ग्रामस्थानी केली होती. या तक्रारीनंतर महसूल विभागाचे कर्मचारी त्याची शहानिशा करून होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यासाठी गावात गेले होते. यावेळी लक्ष्मीकांत विघे आणि त्यांची दोन मुले सौमित्र लक्ष्मीकांत विघे, सौरभ लक्ष्मीकांत विघे यांनी प्रभारी तुरुंग अधिकारी रवींद्र देशमुख यांना धक्काबुक्की केली. याबाबत देशमुख यांच्या तक्रारीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुऩ त्यांना अटक करण्यात आली आहे. यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

ABOUT THE AUTHOR

...view details