अहमदनगर - जिल्ह्यातील बऱ्हाणपूर येथील ग्रामपंचायत सदस्य संकेत भानुदास चव्हाण यांच्यावर काल रात्री (मंगळवार) साडेनऊच्या सुमारास गोळीबार झाला असून त्यात ते गंभीर जखमी झाले आहे. या घटनेनी नेवासा तालुक्यात मोठी खलबळ उडाली आहे. संकेत चव्हाण हे कांगोणी फाट्यावरून बऱ्हाणपूर रोडने आपल्या घरी येत असताना एका ठिकाणी लघुशंकेसाठी थांबले होते. मोटारसायकलवरून आलेल्या व्यक्तींनी गावठी कट्ट्यातून संकेत याच्यावर गोळीबार करून त्यांना जखमी केले. यामध्ये संकेत चव्हाण गंभीररीत्या जखमी झाले आहे. त्यांच्या हातापायावर चार गोळ्या लागल्या असून त्यांना तातडीने उपचारासाठी अहमदनगर येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
कोण आहेत चव्हाण?
नगरमध्ये किक बॉक्सिंगच्या खेळाडूवर गोळीबार; हल्लेखोर फरार - अहमदनगर गोळीबार
संकेत चव्हाण हे कांगोणी फाट्यावरून बऱ्हाणपूर रोडने आपल्या घरी येत असताना एका ठिकाणी लघुशंकेसाठी थांबले होते. मोटारसायकलवरून आलेल्या व्यक्तींनी गावठी कट्ट्यातून संकेत याच्यावर गोळीबार करून त्यांना जखमी केले.
संकेत चव्हाण हे नेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील ग्रामपंचायत सदस्य असून, किक बॉक्सिंगचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. संकेत चव्हाण यांच्यावर गोळ्या झाडून हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले आहेत. हल्ल्यामागील कारण अद्यापही कळू शकले नाही. याप्रकरणी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात संकेत यांचे वडील भानुदास जगन्नाथ चव्हाण यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून बाळासाहेब भाऊसाहेब हापसे व विजय विलास भारशंकर (दोघेही रा. बऱ्हाणपूर, ता. नेवासा) यांच्या विरोधात शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -भाच्याचा खून करणाऱ्या आरोपीला मामाने यमसदनी धाडले