अहमदनगर- नेवासा तालुक्यातील पानेगाव येथे गुरुवारी स्थानिक पत्रकाराच्या घरावर गावातील क्वारंटाईन असलेल्या परिवारांनी एकत्रित येत हल्ला केला. तसेच त्यांच्या घरातील सामानाचीही तोडफोड केली.
पत्रकाराने गावातील सतरा कुटुंब क्वारंटाईन असल्याची बातमी वृत्तपत्रातून छापली होती. या बातमीमुळे गावातील इतर लोक आम्हाला मदत करत नाहीत, असा आरोप करत एकत्रित आलेल्या महिला-पुरुषांनी पत्रकाराच्या घरावर हल्ला केला. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात पत्रकाराने संबंधितांच्या विरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
क्वारंनटाईन परिवारांची बातमी दिल्याचा राग... नेवासा तालुक्यातील पत्रकाराच्या घरावर हल्ला काय आहे प्रकरण-
पानेगाव येथील एक व्यक्ती नेवासे येथील एका रुग्णालयात सेवेत आहे. दरम्यानच्या काळात या रुग्णालयात तपासणी करून गेलेला एक व्यक्ती कोरोना विषाणू बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे या रुग्णाच्या संपर्कात पानेगाव येथील व्यक्ती आली होती. त्यामुळे त्या व्यक्तीस प्रशासनाने शासकीय रुग्णालयामध्ये क्वारंटाईन केले आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांसह काही नागरिक असे एकूण 17 कुटुंबांना होम क्वारंटाईन केले आहे. याबाबतची बातमी पत्रकार यांनी वृत्तपत्रातून दिली होती. याचा राग मनात धरून या कुटुंबीयांनी त्यांच्या घरावर हल्ला केल्याचा प्रकार घडला. पत्रकार बाळासाहेब नवगरे यांच्या घरावर झालेल्या हल्ल्या बाबत जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे.
क्वारंनटाईन परिवारांची बातमी दिल्याचा राग... नेवासा तालुक्यातील पत्रकाराच्या घरावर हल्ला