महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजकीय वादातून मागास जातीच्या कुटुंबीयांच्या घरावर हल्ला, साहित्यासह वाहनांची तोडफोड - राजकीय वादातून हल्ला

Attack On Dalit Family: महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदार संघातील पिंप्री निर्मळ या गावात राजकीय वादातून दोन मागास जातीच्या कुटुंबास मारहाण करत त्यांच्या घरांची मोडतोड केल्याची घटना रात्री घडली. (Attack due to political dispute) पीडित कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर 71 आरोपींविरोधात अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत. (assault on Dalit family)

Attack On Dalit Family
दलित कुटुंबावर हल्ला

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2023, 5:42 PM IST

हल्ल्याविषयी माहिती देताना पोलीस आणि पीडित

पिंप्री निर्मळ (अहमदनगर)Attack On Dalit Family :राज्यातील प्रसिद्ध राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता मतदार संघातील पिंप्री निर्मळ गावात ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांचा प्रचार केल्याच्या राग मनात धरून दोन गटात वाद झाले होते. त्यानंतर सहा डिसेंबरच्या रात्री दीडशे ते दोनशे जणांनी गावातील दोन कुटुंबीयांच्या घरावर हल्ला करत घराची मोडतोड केली. तसंच वाहनांचंही नुकसान केलं. (atrocity filed in assault case)

पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात :या भांडणापूर्वीही गावातील दोन जणांमध्ये वाद झाले होते. त्या संदर्भात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. काल रात्री झालेल्या जोरदार राड्यानंतर पोलिसांनी गावात येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. सर्वच फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

एससी संघटनेचा पोलीस ठाण्यावर मोर्चा :लोणी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची महिती मिळताच एससी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मोठा जमाव, लोणी पोलीस ठाण्यात जमा झाला होता. यावेळी संबंधित आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा रिपाईंचे जिल्ह्याध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिला आहे. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

मागासवर्गीय महिलेला विवस्त्र करून मारहाण : माणुसकीला लाजवेल अशीच एक घटना बिहारमध्ये सप्टेंबर, 2023 मध्ये घडली होती. यामध्ये स्थानिक गुंडांनी मागासवर्गीय महिलेला विवस्त्र करून मारहाण केली. त्यानंतर नराधमांनी तिच्या तोंडात लघवी केली. मारहाणीनंतर गंभीर अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही धक्कादायक घटना पाटणातील खुसरुपूर पोलीस ठाणे परिसरात घटना घडली होती. या घटनेनंतर मागासवर्गीय समाजात भीतीचे वातावरण पसरले.

हेही वाचा:

  1. Religious Disputes Rahuri: राहुरीत विशिष्ट समुदायाकडून पुजाऱ्यासह भाविकांना मारहाण; गावात तणावाचं वातावरण
  2. क्रूरतेचा कळस! तरुणाला बेदम मारहाण, लघुशंका केलेल्या मातीचा तोबरा भरून भुवया उपटल्या
  3. खळबळजनक! तरुणाला नग्न करून बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details