महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीची मदार आता युवकांकडे - बाळासाहेब थोरात

आगामी विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित केले. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील राहाता येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

महात्मा गांधींना अभिवादन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली

By

Published : Jun 16, 2019, 11:51 PM IST

अहमदनगर - लोकसभेच्या निकालानंतर आपण सर्व निराश आहोत. बरेच जण पक्ष सुध्दा सोडून जात आहेत. ज्यांना संघर्ष नको असे जातील. मात्र युवकांनी आता रिकाम्या जागा भरण्याची हीच वेळ आहे. युवकांनी आता पुढे येऊन पक्षाला उभारी देण्याची गरज असल्याचे मत काँग्रेसचे नेते थोरांतांनी व्यक्त केले आहे.

युवक कार्यकर्त्यांस काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले

आगामी विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित केले. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील राहाता येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस वर्कीग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव यांच्या प्रमुख उपस्थिती या शिबीरास होती. मेळाव्यास 650 युवक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी थोरात बोलत होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आपण कुठे कमी पडलो हा प्रश्न आहे. मात्र, काँग्रेसच्या कठीण काळात दरवेळी युवक काँग्रेस खंबीरपणे पक्षाच्या पाठीशी उभी राहिली आहे. त्यामुळे आगामी काळात युवकांना नवी संधी देणारे हे शिबिर ठरणार आहे.

1977 साली ही असाच काँग्रेसचा पराभव झाला. मात्र त्यावेळीही युवक काँग्रेसने पक्षाला उभारी दिली होती. आज देखील युवकांनी एकत्रित लढा देण्याची गरजच आहे. राधाकृष्ण विखें पाटलांवर निशाणा साधत ते थोरात म्हणाले की काँग्रेस सोडून गेलेल्या राधाकूष्ण विखेंनी काँग्रेसवर टीका करून काँग्रेसची काळजी करायला सुरुवात केली. मात्र याची आता आवश्यकता नाही. त्यांची जबाबदारी आता बदल आहे. आणि त्यांनी ती पार पाडावी अशी टिकाही थोरांतानी केली आहे
लोकसभेच्या निवडणुकीत पुलवामा घटनेचा फायदा उचलून भावनिक निवडणूक केली गेली. त्या वेळी मूळ मुद्यांना मात्र मोदी सरकारने बगल दिली होती. मात्र विधानसभा निवडणूकीत परस्थिती वेगळी राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. पुढच्या 100 दिवसात सरकारचे अपयश जनतेपर्यंत आम्ही पोहोचवणार असल्याचे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबेंनी सांगितले.

पंतप्रधान मोदी लोकसभा निवडणूक काळात विकासाच्या मुद्यावर बोललेच नाहीत. मात्र आता विधानसभा निवडणुकीत केंद्र आणि राज्य सरकारच अपयश मतदारांना पुढे पोहोचविण्याच महत्वाच काम युवकांनी करावे, असे आवाहन या मेळाव्यात करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details