महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक 2019 : शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह व्यक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम नगरमधून लढणार

निवडणूक एखाद्या पक्षाकडून लढवणार की, अपक्ष लढणार याबाबत सध्या बोलणी सुरू आहे. येत्या 2-3 दिवसात आपण घोषणा करू असे त्यांनी यावेळी सांगितले. श्रीपाद छिंदम हे भारतीय जनता पक्षाच्या वतीने गेल्या महानगरपालिकेमध्ये उपमहापौर होते. मात्र, निवडणुकीच्या पूर्वी काही काळ त्यांनी आपल्या प्रभागातील काही कामासंदर्भात मनपा अधिकाऱ्यांशी मोबाईलवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते.

सोमवारी दुपारी काही मोजक्या समर्थकांसह नगर तहसील कार्यालयात श्रीपाद छिंदम यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला.

By

Published : Oct 1, 2019, 9:43 AM IST

Updated : Oct 1, 2019, 9:57 AM IST

अहमदनगर -छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने संपूर्ण राज्यात तिरस्काराचा धनी झालेल्या श्रीपाद छिंदम नगर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. यासाठी त्यांनी उमेदवारी अर्जदेखील घेतला आहे. तर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही छिंदम महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

विधानसभा निवडणूक 2019 : वादग्रस्त श्रीपाद छिंदम लढणार नगरमधून,

हेही वाचा -आदित्य ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, राऊतांचे भाकीत

सोमवारी दुपारी काही मोजक्या समर्थकांसह नगर तहसील कार्यालयात येत त्यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला. निवडणूक एखाद्या पक्षाकडून लढवणार की अपक्ष लढणार याबाबत सध्या बोलणी सुरू आहे. येत्या 2-3 दिवसात आपण घोषणा करू असे त्यांनी यावेळी सांगितले. श्रीपाद छिंदम हे भारतीय जनता पक्षाच्या वतीने गेल्या महानगरपालिकेमध्ये उपमहापौर होते. मात्र, निवडणुकीच्या पूर्वी काही काळ त्यांनी आपल्या प्रभागातील काही कामासंदर्भात मनपा अधिकाऱ्यांशी मोबाईलवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. या संभाषणाची ध्वनिफीत व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात राज्यात एकच आगडोंब उसळला होता. त्याप्रकरणी त्यांच्यावर नगरच्या पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे.

Last Updated : Oct 1, 2019, 9:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details