शिर्डी -महाराष्ट्राच अराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मादियाळी पंढरपुरात ( Crowd of devotees Vitthal Pandharpur ) दिसून येत असतांना साईबाबांना विठ्ठल स्वरुप माननाऱ्या भाविकांनी शिर्डीत दर्शनासाठी अलोट गर्दी केलीय. शिर्डी माझे पंढरपुर हि आरती साईबाबा मंदीरात नित्य निमयमान म्हटली जाते. त्याचीच प्रचीती आज झालेल्या भाविकांच्या गर्दीन दिसून येत. साईबाबा संस्थाननेही एकादशीच महत्व लक्षात घेता शिर्डीत येणाऱ्या भाविकांसाठी साबुदाण्याची खिच़डी बनवली आहे.
शिर्डी माझे पंढरपुर अशी रचना -साईबाबां असतांना साईबाबांचे परमभक्त दासगणु महाराज आषाढीच्या वारीला दरवर्षी पंढरपुरला विठ्ठलदर्शनासाठी जात असत. दासगणुंची एक आषाठी वारी चुकली, विठ्ठल दर्शनासाठी आतूर झालेल्या दासगणुंना साईबाबांनी विठ्ठलाच्या रुपात दर्शन दिले. तेव्हा पासून दासगणु महाराजांनी शिर्डी माझे पंढरपुर अशी रचना केली.आजही साईमंदीरात बाबांच्या मंगलस्नानंतर हिच आरती म्हटली जाते. असंख्य भाविक बाबांनाच विठ्ठलाचे रूप मानुन दर आषाढीस साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जावून विठ्ठलरुपी दर्शन घेवून धन्य होतात.