महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या CEO पदी नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची नियुक्ती

२००७ च्या आयएएस बॅचचे अधिकारी व यापूर्वी अमरावती महानगरपालिका आयुक्त तसेच नांदेडचे जिल्हाधिकारी राहिलेले अरुण डोंगरे यांची शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली आहे.

By

Published : Feb 15, 2020, 3:17 PM IST

Arun dongare
अरुण डोंगरे

अहमनदनगर -राज्य शासनाने साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अरुण डोंगरे यांची शुक्रवारी नियुक्ती केली. दिपक मुगळीकर यांची परभणी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अरुण डोंगरे यांची नियुक्ती झाली.

शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची नियुक्ती

२००७ च्या आयएएस बॅचचे अधिकारी असलेल्या डोंगरे यांनी यापूर्वी अमरावती महानगरपालिका आयुक्त, सोलापुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले अरुण डोंगरे १९९१ साली उपजिल्हाधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सेवेत रुजू झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details