महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खरवंडी कासार येथे जबरी चोरी ; अडीच लाखांचा ऐवज लंपास - पांडुरंग तानाजी केळगेंद्रे

पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे शनिवारी राञी पांडुरंग तानाजी केळगेंद्रे यांच्या घरी चोरट्यांनी दरोडा टाकला. चोरट्यांनी एकूण 2 लाख 64 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

खरवंडी कासार
खरवंडी कासार

By

Published : Aug 3, 2020, 6:51 AM IST

अहमदनगर -पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे शनिवारी राञी पांडुरंग तानाजी केळगेंद्रे यांच्या घरी चोरट्यांनी दरोडा टाकला. धारदार शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी एक तोळ्याचे मिनी गंठण, तीन तोळे वजनाची साखळीची पोत, कानातील कर्णफुले आणि 1 लाख 85 हजार रोख रक्कम, असा एकूण 2 लाख 64 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

वाढत्या चोरीच्या घटनेमुळे खरवंडी कासार परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अहमदनगर पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, पाथर्डी पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, पोलीस कॉन्स्टेबल संदीप गर्ज यांनी घटनास्थळी भेट दिली.

घटनेचा पंचनामा करुन पोलिसांनी श्वानपथकाच्या मदतीने चोरट्यांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेतला. चोरटे खरवंडी कासार स्वामी समर्थ मंदीर ते मीडसांगवी अशा मार्गे पळुन गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

शनिवारी रात्री एकच्या सुमारास पांडुरंग केळगेंद्रे हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत राहत्या घरी गाढ झोपेत असताना, पाच चोरटे कटरच्या मदतीने दरवाजा तोडून घरात घुसले. पांडुरंग केळगेंद्रे यांची सून वंदना केळगेंद्रे यांनी चोरट्यांनी पाहताच प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, लहान मुलांना जिवे मारण्याची धमकी चोरट्यांनी त्यांना दिली आणि अंगावरील दागिने काढून घेतले. तसेच चोरट्यांनी घरातील रोख रक्कमही चोरून नेली. शिवाय, घरासमोरील दुचाकीचे दगड मारुन नुकसान केले. या जबरी चोरीमुळे फिर्यादी पांडुरंग केळगेंद्रे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात भादवी कलम 395,397, 427 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड करत आहेत. खरवंडी कासार परीसरात वाढत्या चोरीच्या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खरवंडी कासारमधुन तीन राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने महामार्गावर राञी दरोड्याच्या घटना घडतात.

यापूर्वी भगवानगडावर संत भगवानबाबा यांच्या ऐतिहासिक पुरातन वास्तुपैंकी रायफल तलवार चोरीस गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. अद्याप चोरीचा तपास लागलेला नाही. खरवंडी कासार येथील पोलीस दुरक्षेञात एक पोलीस उपनिरीक्षक व चार कॉन्स्टेबल यांची नेमणूक करुन स्थानक कायमस्वरूपी सुरु ठेवावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details