महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घोडेगाव परिसरात भारत पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा - नगर-औरंगाबाद महामार्ग दरोडा

नगर-औरंगाबाद महामार्गावरील घोडेगाव परिसरात भारत पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडला. या घटनेत पेट्रोल पंप कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झालेले दरोडेखोर

By

Published : Sep 28, 2019, 8:25 PM IST

अहमदनगर -नगर-औरंगाबाद महामार्गावरील घोडेगाव परिसरात भारत पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडला. शनिवारी पहाटेच्या वेळी 8 ते 10 दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवर कोयते आणि तलवारीने हल्ला केला. या दरोड्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

नगर-औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव परिसरात भारत पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा


पोलिसांनी तत्काळ या घटनेतील मुख्य आरोपीला अटक केली आहे. या घटनेत पेट्रोल पंप कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - अजित पवार अहमदनगरमधून अज्ञात ठिकाणी रवाना...

दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या प्रत्येक मालवाहतूक गाडी चालकाला बेदम मारहाण करत त्यांच्या जवळील मुद्देमालही लुटला. त्यानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला. तसेच साहित्याची तोडफोड करत सुमारे 60 हजारांचा मुद्देमाल लुटला.

ABOUT THE AUTHOR

...view details