अहमदनगर - राज्यात कोरनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक यांत्रा रद्द केल्या जात आहेत. शिर्डीतही रामनवमी उत्सवासाठी मुंबईतून मोठ्या प्रमाणात पायी पालख्या घेवून भक्त येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांनी पालख्या आणू नये किंवा पालखीतील भक्तांची संख्या मर्यादीत असावी, असे अवाहन साई संस्थानने केले आहे.
शिर्डीत होणाऱ्या प्रमुख उत्सवांपैकी रामनवमी हा मुख्य उत्सव असतो. यानिमित्त शिर्डी गावची यात्राही भरते. तीन दिवस चालणाऱ्या या रामनवमी उत्सवासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक शिर्डीला येतात. त्यात प्रामुख्याने मुंबई आणि इतर ठिकाणाहुन पायी चालत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. गुढीपाडव्यानंतर भाविक शिर्डीकडे निघतात. मात्र, सध्या राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अनेक ठिकाणच्या यात्राही रद्द केल्या जात आहेत. 2 एप्रिलला रामनवमी आहे. मात्र या रामनवमीला पायी पालख्या आणु नये किंवा आणल्या तरी पालखीतील भाविकांची संख्या मर्यादीत असावी, असे आवाहन साई संस्थान प्रशासनाकडून पालखी मंडळांना करण्यात येत आहे.