अहमदनगर - शहरातील एका ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५४ झाला आहे. या महिलेला सारी सदृश लक्षणे आढळल्याने तिला दोन दिवसापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच तिच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही महिला कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
अहमदनगर शहरातील ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण - ahmednagar corona update
अहमदनगर शहरातील एका ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५४ झाला आहे. या महिलेला सारी सदृश लक्षणे आढळल्याने तिला दोन दिवसापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या महिलेला आता कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
अहमदनगर शहरातील ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण
शहरात गेल्या काही दिवसांपासून एकही रुग्ण आढळून आला नव्हता. आज पुन्हा शहरामध्ये रुग्ण आढळल्याने प्रशासनाने तत्काळ या भागात प्रतिबंधक उपाययोजना करणे सुरू केले आहे.
Last Updated : May 12, 2020, 9:29 PM IST