अहमदनगर - वादग्रस्त कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाच पाहिजे, यासाठी पीसीपीएनडीटी (लिंग निवड प्रतिबंध कायदा) कायद्याचा आधार घेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अॅड. रंजना गवांदे यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात येवून संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला. पीसीपीएडीटी समितीला पुरावे न सापडणे हे दुर्दैव असून, यामागे राजकिय दबाव, झुंडशाही असल्याचा आरोप गवांदे यांनी केला आहे. तसेच समितीचे सचिव व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप मुरंबीकर यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
'...अन्यथा तुम्हालाही सहआरोपी करू'; 'अंनिस'चा इशारा - अंधश्रद्धा निर्मुलन समिती
पीसीपीएनडीटी कायद्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक कारवाई करत नसतील तर त्यांना सहआरोपी करत इंदोरीकर महाराजांवर आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत, असा इशारा अंनिसच्या राज्य सचिव अॅड. रंजना गवांदे यांनी दिला आहे.
!['...अन्यथा तुम्हालाही सहआरोपी करू'; 'अंनिस'चा इशारा INDORIKAR MAHARAJ CONTROVERSIAL KIRTAN](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6223474-thumbnail-3x2-logo.jpg)
हेही वाचा -इंदोरीकर महाराजांना मोठा दिलासा; तुर्तास तरी पीसीपीएनडीटी समितीचा कारवाईसाठी नकार
पीसीपीएनडीटी कायद्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक कारवाई करत नसतील तर त्यांना सहआरोपी करत इंदोरीकर महाराजांवर आम्ही गुन्हा दाखल करणार आहो, असा इशारा अंनिसच्या राज्य सचिव अॅड. रंजना गवांदे यांनी दिला आहे.
विशेष म्हणजे कल्पना देऊनही डॉ. मुरंबीकर आज (गुरुवारी) अंनिस कार्यकर्त्यांचे निवेदन घ्यायला अनुपस्थित होते. इंदोरीकर महाराज यांची वादग्रस्त क्लिप सायबर पोलिसांना सापडत नसली तरी ही क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली असताना आणि या वक्तव्याचे धर्मग्रंथांच्याआधारे महाराज समर्थन करणारे व्हिडीओ व्हायरल झालेले असताना पीसीपीएनडीटीचे प्रमुख डॉ. प्रदीप मुरंबीकर कारवाई का करत नाहीत असा प्रश्न अंनिसने उपस्थित केला आहे.
हेही वाचा -.. तर 'अंनिस' दाखल करणार इंदोरीकरांविरोधात तक्रार