अहमदनगर - गाव गावाशी जागवाभेदभाव समूळ मिटवाउजळा ग्रामोन्नतीचा दिवातुकड्या म्हणे. या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ओळींचा हवाला देत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होईल असे जाहीर केले. शनिवारी राळेगणसिद्धी मधील लाभेश औटी आणि जयसिंग मापारी या दोन्ही गटाला एकत्र बसवले. आमदार निलेश लंके यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अण्णांनी गावात ग्रामपंचायत निवडणूक न घेता एकीच्या बळावर ग्रामविकासाचे ध्येय कायम असल्याचे स्पष्ट केले.
आमदार निलेश लंकेच्या बिनविरोध ग्रांमपंचायत निवडणूक संकल्पनेला अण्णांचा पाठिंबा
आमदार निलेश लंकेच्या बिनविरोध ग्रांमपंचायत निवडणूक संकल्पनेला अंण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी राळेगणसिध्दी गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होईल असे जाहीर केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडणुका करतील त्यांना आपल्या आमदार निधीतून आणि इतर निधीतून पंचवीस लाख रुपये ग्राविकासासाठी दिले जातील असे घोषित केले आहे. लंके यांची संकल्पना आदर्श तंटामुक्त आणि विकासाभिमुख गाव यासाठी असल्याने राळेगणसिद्धी परिवार या आदर्शयोजनेला पाठिंबा देत असल्याचे अण्णांनी सांगितले. गावातील लाभेश औटी आणि जयसिंग मापारी या दोन्ही नेत्यांनी आपण निवडणूक न लढवता अण्णांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवडणूक पार पाडू असे यावेळी सांगितले.