महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Anna's movement : सरकारच्या पत्रानंतर अण्णा हजारेंनी उपोषण केले स्थगित - By state excise officials

राज्यसरकारने (State Government) सुपर मार्केट आणि एक हजार स्क्वेअर फूट पेक्षा मोठ्या किराणा दुकानात वाईन विक्री (Wine sales in the store) संदर्भातील निर्णयाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 14 फेब्रुवारी पासून उपोषण आंदोलन सुरू करणार असल्याचे घोषित केले होते. मात्र आज रविवारी राळेगणसिद्धीमध्ये (Raleganasiddhi) झालेल्या ग्रामसभेत अण्णांनी हे आपले नियोजित उपोषण आंदोलन तूर्त स्थगित (Anna Hazare's fast stopped) करण्याचा निर्णय घोषित केला आहे.

anna_hajare
अण्णा हजारे

By

Published : Feb 13, 2022, 1:51 PM IST

अहमदनगर : ग्रामसभेमध्ये राळेगण-सिद्धी परिवाराने अण्णांचे 84 वय इतके असताना आता उपोषण आंदोलन करू नये अशी विनंती केली त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्कच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी (By state excise officials) काल शनिवारी अण्णांची भेट घेऊन एक लेखी पत्र अण्णांना दिले आहे. त्या पत्रात राज्य सरकारने वाईन विक्री (Wine sales in the store) याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नसून नागरिकांचे मते आजमावून त्यानंतर यावर अंतिम निर्णय होणार आहे आणि त्यानंतर सरकार याबाबतची घोषणा करणार आहे, तूर्तास याबद्दल सरकारने वाईन विक्रीला सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमध्ये परवानगी अद्याप दिली नसल्याचे स्पष्ट केलेला आहे.

त्यामुळे अण्णांनी राज्य सरकारचे पत्र आणि राळेगण-सिद्धी परिवाराने आज ग्रामसभेत अण्णांना केलेली विनंती मान्य करत तूर्तास उद्यापासून 14 फेब्रुवारी पासून उपोषण आंदोलनाचा निर्णय तूर्तास स्थगित ठेवलेला असल्याची घोषणा केली आहे. अण्णांच्या या निर्णयामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details