अहमदनगर -ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गतवर्षी शेतमालाला सी-टू प्लस फिफ्टी भाव, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता आदी मागण्यासाठी आंदोलन पुकारले होते. अण्णांनी आंदोलन करू नये म्हणून तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही म्हणून अण्णांनी या मागण्यांच्या पुर्ततेसाठी पुन्हा आंदोलनाचा एल्गार दिला असून लवकरच आंदोलनाची तारीख आणि ठिकाण घोषित करू, असे पत्र सध्याचे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना पाठवले आहे.
तत्कालीन कृषिमंत्री राधामोहन सिंह, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुभाष भामरे, गिरीश भामरे आदींच्या उपस्थितीत अण्णांना या प्रश्नावर केंद्रीय समिती नेमून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. या समितीचे प्रमुख तत्कालीन केंद्रीय कृषिराज्यमंत्री सोमपाल शास्त्री, नीती आयोगाचे सदस्य रमेशचंद्र होते. मात्र आता दोन वर्षे उलटली असली तरी या समितीने या आश्वासनावावर कोणताही मार्ग काढलेला नाही, म्हणून आता पुन्हा एकदा या प्रश्नावर आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे अण्णांनी पत्रात म्हटले आहे. आंदोलनाची दिशा, तारीख आणि वेळ लवकरच घोषित केली जाईल, असेही अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.
पत्रात सध्या सुरू असलेल्या दिल्ली आंदोलनाचा उल्लेख नाही -
कृषीविषयक मागण्यांसाठी अण्णांचा पुन्हा आंदोलनाचा एल्गार.. वेळ व ठिकाण लवकरच घोषित करणार - अण्णा हजारे आंदोलन
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गतवर्षी शेतमालाला सी-टू प्लस फिफ्टी भाव, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता आदी मागण्यांसाठी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारला पत्र पाठवून अण्णांनी आंदोलनाचा एल्गार दिला आहे.
अण्णांनी आज सोमवारी लिहिलेले पत्र हे विद्यमान केंद्रीय कृषी मंत्र्यांना उद्देशून लिहले आहे, ते त्यांनी 5 फेब्रुवारी 2019 ला त्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत आणि त्यांना त्यावेळी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनाबाबत आहे. मात्र या पत्रात अण्णांनी सध्या दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा कोणताही उल्लेख केलेला नाही. त्यावेळी दिलेली अश्वसने अद्याप पूर्ण न झाल्याने आपण आंदोलन करत असल्याचे एकंदरीत पत्रातून दिसून येत आहे.