महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

समाज परिवर्तनाचा ध्यास असलेले दुर्मिळ व्यक्तित्व हरवले; डॉ.लागू यांच्या निधनांवर अण्णांची संवेदना - News about Doctor Shriram Lagu

आण्णा हजारे यांनी डॉक्टर श्रीराम लागू यांच्या निधनांवर संवेदना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले लागू हे उत्तम कलाकार होते. मात्र, त्या बरोबर समाज परिवर्तन कसे होईल, याचा ध्यास त्यांना होता.

anna-hazare-pays-tribute-to-dr-sriram-lagu
समाज सेवक अण्णा हजारे

By

Published : Dec 18, 2019, 5:50 PM IST

अहमदनगर - डॉक्टर श्रीराम लागू हे उत्तम कलाकार होते. ते केवळ मनोरंजन न करता समाज परिवर्तन कसे होईल याचा ध्यास त्यांना होता, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया समाजसेवक अण्णा हजारे यांनी डॉ. लागू यांच्या निधनांवर व्यक्त केली आहे. डॉ. श्रीराम लागू यांनी पुण्यात आळंदी येथे अण्णा हजारे यांच्या आंदोलनात दोन दिवस सहभाग घेत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. याची आठवण काढत त्यांच्यात एक सामाजिक, राष्ट्रीय दृष्टिकोन आणि सेवाभाव होता असे अण्णा हजारे यांनी म्हटले. डॉक्टर श्रीराम लागू यांच्या सारखे दुर्मिळ व्यक्तिमत्त्व आपल्यातून हरपल्याची संवेदना अण्णांनी व्यक्त केली आहे.

समाज सेवक अण्णा हजारे

ABOUT THE AUTHOR

...view details