महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Anna Hazare On Lata Mangeshkar : भारताचे वैभव हरपले, अण्णा हजारे यांनी दिला लतादीदींच्या आठवणींना उजाळा - भारताचे सर्वात मोठे वैभव काळाच्या पडद्याआड

लतादीदींच्या जाण्यामुळे भारताचे सर्वात मोठे वैभव काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशी गायिका पुन्हा होणे नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare On Lata Mangeshkar ) यांनी दिली आहे. पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार मिळाला तेव्हाही एवढा आनंद झाला नसेल, तेवढा आनंद मला लता दीदी हस्ते मिळालेल्या जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना झाला होता.

अण्णा हजारे
अण्णा हजारे

By

Published : Feb 6, 2022, 4:50 PM IST

अहमदनगर- लतादीदींच्या जाण्यामुळे भारताचे सर्वात मोठे वैभव काळाच्या पडद्याआड गेले ( Lata Mangeshkar Passed Away ) आहे, अशी गायिका पुन्हा होणे नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare On Lata Mangeshkar ) यांनी दिली आहे. गाणारे लोक अनेक आहेत पण लतादीदींसारखा आवाज, गाण्यातील भाव आणि संदेश हे दुर्मिळ आहे. भारतातील सर्व भाषांमधून गाणी गाणाऱ्या त्या एकमेव गायिका असाव्यात. त्यांनी गायिलेली भक्तीगीते, भावगीते व देशभक्तीपर गीते ही सामान्य माणसांना आनंद आणि प्रेरणा देणारी होती. वेगवेगळ्या क्षेत्रात कष्ट करणाऱ्या श्रमिकांनी थकल्यानंतर लतादीदींचे गाणे ऐकले किंवा त्यांचा आवाज कानावर पडला की, क्षणात श्रमपरिहार होत असे, अशी भावनाही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लतादीदींच्या निधनावर व्यक्त केली आहे.

बोलताना अण्णा हजारे

लतादीदींचा आणि माझा अनेक वेळा भेटण्याचा प्रसंग आला. त्यांच्या हस्ते मिळालेला जीवन गौरव पुरस्कार हा जीवनातील सर्वाधिक आनंदाचा क्षण होता. पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार मिळाला तेव्हाही एवढा आनंद झाला नसेल, तेवढा आनंद मला त्यांच्या हस्ते मिळालेल्या जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना झाला होता. त्यांनी गायिलेले ‘ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहिद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी’ हे गीत विसरणे कदापि शक्य नाही. हे गीत ऐकताना पंतप्रधानांसह उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी आले होते. आजही ते गीत ऐकताना अनेकांच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. हे गाणे ऐकून लाखो लोकांच्या मनात देशभक्तीची प्रेरणा जागृत होते, असे अण्णा हजारे यांनी आठवणींना उजाळा देताना म्हटले.

गीतेत श्रीकृष्णाने म्हटल्याप्रमाणे ‘अंतःकाळी जो माझे नामस्मरण करतो त्याचा पवित्र आत्मा मलाच येऊन मिळतो’ याप्रमाणे लतादीदींना चिरशांती मिळालेलीच आहे यात शंका नाही. लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली, या शब्दात अण्णा हजारेंनी भावविवश होत दीदींनी श्रद्धांजली अर्पण केली.

हेही वाचा -PM MODI ON LATA MANGESHKAR : पंतप्रधान नरेंद्र मोदी गानकोकिळेला श्रद्धांजली देण्यासाठी मुंबईत येणार

ABOUT THE AUTHOR

...view details