अहमदनगर - राज्य सरकारने सुपर मार्केट आणि एक हजार स्क्वेअर फूटपेक्षा मोठ्या किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. याला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा विरोध आहे. अण्णा हजारे यांनी राज्य सरकारच्या विरोधात 14 फेब्रुवारीपासून प्राणांतिक उपोषण आंदोलन सुरू करणार असल्याचे घोषित केले होते. मात्र, आज रविवारी राळेगण सिद्धीमध्ये झालेल्या ग्रामसभेत अण्णांनी हे आपले नियोजित उपोषण आंदोलन तूर्त स्थगित ठेवण्याचा निर्णय घोषित केला आहे.
माहिती देताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हेही वाचा -Anna's movement : सरकारच्या पत्रानंतर अण्णा हजारेंनी उपोषण केले स्थगित
ग्रामसभेमध्ये राळेगण सिद्धी परिवाराने अण्णांचे 84 वय इतके असताना आता उपोषण आंदोलन करू नये, अशी विनंती केली. त्याचबरोबर, राज्य उत्पादन शुल्कच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल शनिवारी अण्णांची भेट घेऊन एक लेखी पत्र अण्णांना दिले आहे. त्या पत्रात राज्य सरकारने वाईन विक्री याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नसून, नागरिकांचे मते आजमावून त्यानंतर यावर अंतिम निर्णय होणार आहे, आणि त्यानंतर सरकार याबाबतची घोषणा करणार आहे. तूर्तास याबद्दल सरकारने वाईन विक्रीला सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमध्ये परवानगी अद्याप दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
यामुळे अण्णांनी राज्य सरकारचे पत्र आणि राळेगण सिद्धी परिवाराने आज ग्रामसभेत अण्णांना केलेली विनंती मान्य करत उद्यापासून (14 फेब्रुवारी) उपोषण आंदोलनाचा निर्णय तुर्तास स्थगित ठेवलेला असल्याची घोषणा केली आहे. अण्णांच्या या निर्णयामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
हेही वाचा -Ahmednagar Car Accident : भीषण कार अपघातात तीन मित्रांवर काळाचा घाला