अहमदनगर - लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा आणि शेतमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे आंदोलनाला सुरूवात केले आहे. अण्णांचे आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, सरकारकडून अजून कुठलाही प्रतिसाद नसल्यामुळे अण्णा आंदोलनावर ठाम आहेत.
राळेगणसिद्धी आंदोलन; अण्णांचे वजन घटल्याने डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता
लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा आणि शेतमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे आंदोलनाला सुरूवात केले आहे.
राळेगणसिद्धीमध्ये आज ग्रामस्थांकडून सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. यावेळी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात येणार आहे. अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी विविध स्तरातील संघटना पाठिंबा देत आहेत. सलग तिसरा दिवस असून, अण्णांचे वजन घटले आहे. दरम्यान डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे.
अण्णा हजार यांनी बुधवारी आंदोलनाला सुरूवात केली होती. बुधवारी दिवस भरात अण्णांनी उपोषण सुरू केल्यानंतर सरकारच्यावतीने बोलणी करण्यासाठी येणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आलेच नव्हते.