महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...म्हणून अण्णा हजारे धारण करणार मौन; उपोषणाचाही दिला इशारा

सरकारने महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत तातडीने पाऊल उचलावे, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या 20 डिसेंबरपासून मौन धारण करणार आहेत. सरकारने पावले न उचलल्यास बेमुदत उपोषण करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

hajare
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

By

Published : Dec 9, 2019, 8:06 PM IST

अहमदनगर- दिल्लीतील निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा होऊन ७ वर्षे उलटली, तरी अजून शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. देशात जलद गती न्यायालयात लाखो प्रकरणे पडून आहेत. न्याय आणि शिक्षेला उशिर होत असल्यानेच हैदराबाद एन्काऊंटरचे जनतेने स्वागत केले आहे. न्याय मिळण्यास उशिर होत असताना याबाबत सरकारची उदासीनता चिंतीत करणारी आहे. सरकारने याबाबत तातडीने पावले उचलावीत, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या 20 डिसेंबरपासून मौन धारण करणार आहेत. सरकारने पावले न उचलल्यास बेमुदत उपोषण करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये त्यांनी दिल्ली निर्भया प्रकरण, पुण्यातील ज्योतीकुमार चौधरी प्रकरणातील फाशीची अंमलबजावणी न झाल्याने गुन्हेगारांची रद्द झालेली फाशी, हैद्राबाद निर्भया प्रकरण आणि एन्काऊंटर आदी प्रकरणांचा दाखला देत न्यायाला आणि शिक्षेला उशिर होणे नवीन गुन्ह्यांना प्रोत्साहित करणारा ठरत असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा -'त्या' परिस्थितीत झालेले हैदराबादचे एन्काऊंटर योग्यच - अण्णा हजारे

बलात्कार आणि हत्या प्रकरणात 2014 ला शेवटची फाशी झालेली आहे. त्यानंतर 426 प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा होऊनही त्यांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. जलद गती न्यायालयात ६ लाखांहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यातील अनेक प्रकरणे सहा-सात वर्षांपूर्वीची आहेत. निर्भया फंड महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये उपयोगाविना पडून आहे. हेल्पलाईन नंबर 1091 काम करत नाही. 2012 पासून ज्यूडीसीएल अकाऊंटबिलिटी बिल संसदेत पडून आहे. आदी गोष्टींवर अण्णांनी बोट ठेवत पंतप्रधानांकडे नाराजी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details