अहमदनगर -लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया हा उत्सव आहे. मात्र, यामध्ये कोणतीही बाधा न आणता जनतेने आपण या देशाचे मालक आहोत. लोकप्रतिनिधी हे देशाचे सेवक आहेत. या भावनेतून लोकप्रतिनिधींची निवड करावयाची, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. काल राळेगणसिद्धी या गावी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.
लोकशाहीत मतदार हा मालक - समाजसेवक अण्णा हजारे - महासाष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो स्वातंत्र्यसेनानी आपले प्राणार्पण देशासाठी केलेले आहे. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाले, अशी भावना जनतेने मनात ठेवली पाहिजे. लोकशाहीचा उत्सव साजरा केला पाहिजे, असेही अण्णांनी सांगितले.
अण्णा हजारे