अहमदनगर- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची झेड (Z) सुरक्षा असलेल्या सुरक्षा यंत्रणेमधून एक पथक कमी करण्यात आले आहे. नाशिकमधील विशेष सुरक्षा विभागातील (SPU) हे पथक कमी केले आहे.
...म्हणून अण्णा हजारेंच्या सुरक्षेत केली कपात
कोरोनासारख्या संसर्ग रोगाच्या पार्श्वभूमीवर अन्य कामासाठी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी अण्णा हजारे यांनी सुरक्षा कमी करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली होती.
कोरोनासारख्या संसर्ग रोगाच्या पार्श्वभूमीवर अन्य कामासाठी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी अण्णा हजारे यांनी सुरक्षा कमी करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली होती. त्यानंतर ही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. अण्णा हजारेंची मागणी मान्य करत नाशिक येथील विशेष सुरक्षा विभागातील एक पथक कमी करण्यात आले असल्याची माहिती अण्णा हजारे यांचे स्वीय सहाय्यक संजय पठारे यांनी दिली आहे.
अण्णा यांनी भ्रष्टाचाराविरोधात मोठंमोठी आंदोलने उभे करून एक ना अनेक अधिकारी आणि मंत्र्यांना कारागृहाचा रस्ता दाखवला होता, तर मध्यंतरीच्या काळात अण्णा हजारे यांना जीवे मारण्याच्या धमक्यादेखील आल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर अण्णा यांच्या सुरक्षेसाठी सरकारने झेड सुरक्षा पुरवली होती. या सुरक्षेमध्ये तब्बल 19 पोलिसांचा फौजफाटा असायचा त्यात 13 अहमदनगरमधील पोलीस कर्मचारी तर 6 नाशिकमधील विशेष सुरक्षा विभागातील अधिकारी कर्मचारी होते.