महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 1, 2019, 2:45 PM IST

ETV Bharat / state

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी - अण्णा हजारे

राज्यात अतिवृष्टी, लांबलेला पाऊस आणि पुरपरस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशावेळी सरकारने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.

अण्णा हजारे

अहमदनगर - राज्यात अतिवृष्टी, लांबलेला पाऊस आणि पुरपरस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशावेळी सरकारने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. ते अहमदनगर येथे बोलत होते.

अण्णा हजारे दुष्काळाबद्दल संवाद साधताना

हेही वाचा - बागलाण तालुक्यात पावसामुळे पीकाचे नुकसान, शेतकऱ्याची आत्महत्या

आपल्या देशाला आपण कृषीप्रधान देश म्हणतो. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी आत्महत्या करत असतील तर सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी आग्रही मागणी अण्णांनी केली आहे.

हेही वाचा - दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसह मच्छीमारांना लवकर मदत द्या, आदित्य ठाकरेंची राज्यपालांना विनंती

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details