अहमदनगर- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा बुधवारी स्मृतिदिन होता. त्यानिमित्ताने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विलासरावांबद्दल सहृदय संवेदना व्यक्त केली आहे.
दिवंगत नेते विलासराव देशमुख म्हणजे राजकारणातील समाजकारणाची दृष्टी असलेला संपन्न नेता - अण्णा हजारे
माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा बुधवारी स्मृतिदिन होता. त्यानिमित्ताने समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्वर्गीय विलासरावांबद्दल सहृदय संवेदना व्यक्त केली.
विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असतानाच ग्रामसभेला अधिकार, बदल्या, दफ्तर दिरंगाई आदींचा कायदा संमत झाला. विलासरावांनी नेहमीच अण्णांच्या मागण्या आणि आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. अण्णा आणि त्यांचे संघर्ष होवूनही सौहार्दाचे संबंध नेहमीच राहिले आहे. देशमुख यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अण्णांनीही अनेकदा आपले आंदोलन सामंजस्याने मागे घेतले.
बुधवारी दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिना निमित्ताने अण्णांनी राजकारण आणि समाजकारणातील दृष्टी असलेला नेता म्हणून त्यांच्या बद्दल गौरोद्गार काढले. राजकारणात सगळेच वाईट लोक नसतात. विलासराव यांच्या सारखे चांगली लोकंही असतात, असे अण्णा म्हणाले.