अहमदनगर- इंग्रज सत्ता परकीय होती. त्यांना हटवण्यासाठी हजारो-लाखोंनी आपल्या जिवाचे बलिदान देत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. या त्यागाला आपण विसरता कामा नये, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज 73व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केले आहे.
स्वातंत्र्यसेनानींचे बलिदान विसरू नका - अण्णा हजारे - social worker anna hajare
स्वातंत्र्यसेनानींचा त्याग हा अमूल्य आहे. आज आपण स्वतंत्रतेचे फळ चाखत आहोत, पण त्यामागे स्वातंत्र्यसेनानींचा त्याग आणि बलिदान आहे हे विसरू नका, असे सांगताना अण्णांनी आज भारतीयांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे.
अण्णा हजारे
स्वातंत्र्यसेनानींचा त्याग हा अमूल्य आहे. आज आपण स्वतंत्रतेचे फळ चाखत आहोत, पण त्यामागे स्वातंत्र्यसेनानींचा त्याग आणि बलिदान आहे हे विसरू नका, असे सांगताना अण्णांनी आज भारतीयांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. आपला देश लोकशाही मार्गाने चालणारा आहे. त्यासाठी संसदेत आणि विधानसभेत चारित्र्यशील व्यक्ती आपण पाठवल्या पाहिजेत. भ्रष्ट, गुंड, मवाली लोकांना आपण दूर ठेवले पाहिजे, असे अण्णांनी यावेळी म्हटले आहे.