अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काल (सोमवार) पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांना गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले.
जळगाव घरकुल घोटाळ्याचे तपास अधिकारी सिंधू यांचे अण्णांकडून अभिनंदन - IO
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काल (सोमवार) पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांना गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले.
जळगाव घरकुल घोटाळ्याचा तपास इशू सिंधू यांनी करून आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यावेळी सिंधू यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव आल्याचे बोलले जात आहे. मात्र, एका गुलाबा प्रमाणे काट्यात राहून सिंधू यांनी निर्भयपणे तपास केला आणि त्याचीच एक परिणीती म्हणून न्यायालयाने सर्व ४८ आरोपींना कठोर शिक्षा सुनावली असल्याच्या पार्श्वभूमीवर अण्णांनी काल इशू सिंधू यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले.
जळगाव घरकुल घोटाळ्यात आरोपी असलेले सुरेश जैन यांनी अण्णांविरोधात अनेक पत्रकार परिषदा घेत आरोप केले होते. तर अण्णांनी पण या सर्व घोटाळ्याची चौकशी व्हावी यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. या पार्श्वभूमीवर प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने कारावास आणि मोठा आर्थिक दंड ठोठावला असल्याने अण्णांनी समाधान व्यक्त केले आहे.