अहमदनगर-राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. प्रचारादरम्यान एकोंएकांवर आरोप-प्रत्यारोप होत असतात, यातून अनेकवेळा वाद होऊन हाणामारीपर्यंत वेळ जाते. यात त्या-त्या गावातील तरुण देखील आघाडीवर असतात. मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अशा तरुणांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अण्णांचा तरुणांना सयंम ठेवण्याचा सल्ला - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे न्यूज
निवडणुकांमध्ये अनेकवेळा परिस्थिती हाताबाहेर जाते, वाद होतात यात तरुण आघाडीवर असतात, मात्र अशा तरुणांना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सयंमाचा सल्ला दिला आहे. ते ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलत होते.
अण्णा हजारे
पश्चिम बंगालमध्ये सत्तेसाठी मारामाऱ्या-खून पडतात, प्रचंड गोंधळ उडतो, युवकवर्गाला यातूनच आपणही काहीतरी करून निवडणूक लढवू आणि जिंकू असे वाटते. मात्र जनतेचा कौल आल्यावर सगळे सत्य समोर येत असते. त्यामुळे निवडणुकांमध्ये तरुणांनी संयम ठेवावा असा सल्ला अण्णांनी दिला आहे. दरम्यान राळेगणसिद्धीमध्ये दोन प्रमुख गट बिनविरोध निवडणुकीसाठी तयार आहेत. मात्र गावातील एका तरुण गटाने निवडणुकीचा आग्रह धरल्याचे देखील अण्णांनी यावेळी म्हटले.