शिर्डी ( अहमदनगर ) - राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीने ( अंमबजावणी संचलनालय ) समन्स बजावले ( ED Summons Anil Parab ) आहे. मात्र, अनिल परब यांनी शिर्डीतील साई चरणी धाव घेतली ( Anil Parab In Shirdi ) आहे. मला काल ( मंगळवार ) नोटीस आली, परंतु मी मुंबईत नव्हतो. जेव्हा जेव्हा ईडी कडून मला बोलवलं जाईल, तेव्हा मी जाऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देईल. पण, किरीट सौमैया कोण?, त्याच्या प्रश्नाची उत्तरे मी का देऊ, असा सवालही परब यांनी प्रसारमाध्यमांना केला आहे.
मे महिन्यात साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने 7 ठिकाणी छापेमारी केली होती. त्यादिवशी अनिल परब यांची 13 तास चौकशी करण्यात आली होती. ईडीला साई रिसॉर्टच्या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय आहे. त्यानंतर आता अनिल परब यांना ईडीने समन्स बजावलं आहे. मात्र, अनिल परब यांनी थेट साईबाबांच्या दरबारी धाव घेतली आहे. त्यांच्या दौऱ्याची शासकीय यंत्रणांना कोणतीही माहिती नव्हती. शिवसेनेचे मोजके पदाधिकारी त्यांच्या सोबत होते. तेव्हा त्यांनी साई मंदिरातील दुपारच्या आरतीला उपस्थिती लावली.