महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अनिल देशमुखांकडून गृहखाते काढून घेतले जाणार नाही - बाळासाहेब थोरात - Ahmednagar District News Update

अनिल देशमुख यांच्याकडून गृहमंत्रीपद काढून घेतले जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र देशमुख यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून गृहखाते काढून घेतले जाणार नाही, असे माझे वैयक्तीक मत असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

अनिल देशमुखांकडून गृहखाते काढून घेतले जाणार नाही
अनिल देशमुखांकडून गृहखाते काढून घेतले जाणार नाही

By

Published : Mar 20, 2021, 6:45 PM IST

अहमदनगर - अनिल देशमुख यांच्याकडून गृहमंत्रीपद काढून घेतले जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र देशमुख यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून गृहखाते काढून घेतले जाणार नाही, असे माझे वैयक्तीक मत असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. ते आज संगमनेरमध्ये बोलत होते. दरम्यान महाराष्ट्रातील पोलीस चांगले काम करत आहेत. मात्र चुकीचे काम कोणी केले असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. असेही त्यांनी म्हटले आहे.

सध्या कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात वाद असल्याची बातमी प्रसारमाध्यमातून दाखवली जात आहे. मात्र या बातमीमध्ये तथ्य नाही. सध्या कॉंग्रेसचा कोणताही नेता नाराज नाही, आणि पुढे वाद निर्माण झाल्यास आम्ही चर्चा करून हा वाद सोडवू असेही यावेळी थोरात म्हणाले.

अनिल देशमुखांकडून गृहखाते काढून घेतले जाणार नाही

लवकरच विश्वस्त मंडळाची नियुक्ती

दरम्यान यावेळी त्यांनी साई संस्थान विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीबाबत राज्य सरकारला प्रश्न विचारला होता. तेव्हा येत्या दोन महिन्यांमध्ये विश्वस्त मंडळाची नियुक्ती करणार असल्याचे राज्य सरकारने न्यायालयात सांगितले असल्याचे थोरात यांनी म्हटले. काही दिवसांपासून साई संस्थान अधिकाऱ्यांच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर विश्वस्त मंडळाची लवकरात लवकर नियुक्ती करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे.

नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे

राज्यातील कोरोना स्थितीबद्दल बोलताना थोरात म्हणाले की, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना रुग्ण कमी झाले होते, त्यामुळे सर्व व्यवहार सुरू करण्यात आले, मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करावे, मुख्यमंत्र्यांनी देखील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा -राष्ट्र्वादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना 'संसद महारत्न' पुरस्कार प्रदान

ABOUT THE AUTHOR

...view details