महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Anant Ambani Donation To Saibaba Sansthan : अनंत अंबानींनी साईबाबा संस्थानला दिली 'इतक्या' कोटींची देणगी - साईबाबा संस्थानला देणगी

अनंत अंबानी यांनी दिपावली निमित्ताने शिर्डीत येवुन साईबाबांच्या समाधीचे दर्शन (Anant Ambani Donation On occasion of Diwali) घेतले. यावेळी अनंत अंबानी यांनी साईबाबा संस्थानला 1 कोटी 51 लाख रुपायांची देणगी दिली, असल्याची माहिती साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्याश्री बानायत यांनी दिली (Anant Ambani Donation to Saibaba Sansthan) आहे.

Anant Ambani Donation Shirdi Saibaba
दिपावली निमित्ताने अंबानी कुटुंबीयांनी साईबाबांना दिली देणगी

By

Published : Oct 25, 2022, 12:10 PM IST

शिर्डी (अहमदनगर) :प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी दिपावली निमित्ताने शिर्डीत येवुन साईबाबांच्या समाधीचे दर्शन (Anant Ambani Donation On occasion of Diwali) घेतले. यावेळी अनंत अंबानी यांनीसाईबाबा संस्थानला 1 कोटी 51 लाख रुपायांची देणगी दिली, असल्याची माहिती साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्याश्री बानायत यांनी दिली (Anant Ambani Donation to Saibaba Sansthan) आहे.

साईबाबांच्या चरणी दान :शिर्डी साईबाबांचे परमभक्त असलेले अंबानी कुटुंबीय नेहमी साईबाबांच्या चरणी मोठे दान देत (Saibaba Sansthan Shirdi) असतात. दिपावली निमित्ताने अनंत अंबानी यांनी शिर्डीत येत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांनी साईबाबांची शिर्डी माझे पंढरपूर ही छोटी आरती करत पाद्य पूजा केली. साईबाबांच्या दर्शनानंतर साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्याश्री बानायत यांनी अनंत अंबानी यांचा साई शॉल व साई मूर्ती देवुन सत्कार केला (Anant Ambani donation) आहे.


अंबानीचे संपूर्ण कुटुंब साईभक्त :दरम्यान उद्योगपती अनंत अंबानी यांनी 1 कोटी 51 लाख रुपये देणगी साईचरणी अर्पण केली. सदर देणगीचा धनादेश संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांच्‍याकडे सुपूर्त केला. उद्योगपती अंबानीचे सर्व कुटुंब हे साईभक्त असून नेहमी साई दर्शनाला येत असतात. यापूर्वीही नीता अंबानी यांनी शिर्डीला भेट देऊन साई संस्थांनला वेगवेगळ्या स्वरूपात देणगी दिली (Saibaba Shirdi) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details