शेवगाव (अहमदनगर) - तालुक्यातील बोधगावपासून दोन किमी आंतरावर आसलेल्या एकबुरजी वस्तीलगत पाचपुते यांच्या घरी बुधवार (दि.16 सप्टें.) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घराच्या खिडकिच्या पट्ट्या तोडत चोरट्यानी घरात प्रवेश करत रोख राकमेसह एक लाख 79 हजारांचा ऐवज लंपास केला.
बुधवार (दि.16 सप्टें.) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या पूर्वेकडील दीड फुटाच्या खिडकीच्या पट्ट्या तोडत त्यांनी घरात प्रवेश मिळवला. आतील दाराची कडी उघडून त्यांनी घरातील तीन पेट्या बाहेर नेल्या. दरम्यान, तत्पूर्वी परशुराम पाचपुते यांच्या मातोश्रींच्या लक्षात हा सगळा प्रकार आल्याने त्यांनी चोरांच्या मागे जात आरडाओरड केली. यावेळी परशुराम पाचपुते यांचे मोठे भाऊ नानासाहेब पाचपुते यांनी झोपेतून उठून त्यांच्या पाठलाग केला. यादरम्यान, बॅटरीच्या प्रकाशाच्या दिशेने दोन दगड त्यांनी फेकल्याने बॅटरी फुटुन खाली पडली. यावेळी आरडाओरड आणि घरातील सगळेच जागे झाल्याने चोरट्यांनी तीन पेट्या घेऊन पळ काढला. चोरून नेलेल्या पेट्यात दोन कर्ण फुले, गळ्यातील मणी, नाकातील नथ, वेल,सोनसाखळी आणि 10 हजार रोख रक्कम, असा एकुण सुमारे एक लाख 79 हजारांचा ऐवज लंपास केला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बोधेगाव पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा यांसह पोलीस कर्मचारी राजेंद्र ढाकणे, अण्णा पवार यांनी सकाळीच घटनास्थळी भेट दिली. घटनेची माहिती घेत आजूबाजूच्या शेतात पेट्यांचा शोध घेण्यात आला यावेळी एका नंतर एक अशा तीन ही पेट्या सापडल्या. यावेळी कपडे साड्या आणि सोन्याचे रिकामे खोके देखील आढळून आले. चोरांचा माग काढण्यासाठी पावरा यांनी श्वान पथकाचेही पाचारण केले होते. यावेळी श्वानाला खिडकीच्या तोडलेल्या पट्ट्यांचा वास देण्यात आला. पण, त्याने घडलेल्या ठिकाणापासून शेवगाव गेवराई रस्त्यापर्यंतच माग काढला. तर ठसे तज्ज्ञांकडून देखील त्याचे पडलेल्या वस्तुंचे ठसे घेण्यात आले. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
चोरट्यांनी लहानग्याचा पिगीबँकही सोडला नाही