अहमदनगर -जिल्ह्यात कोरोना साखळी तोडण्यासाठी सर्वेक्षण मोहीम राबविली जात असून, यात गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकात आरोग्य कर्मचारी, एक अंगणवाडी सेविका आणि एका शिक्षकाचा समावेश करण्यात आला आहे. गावात कोरोना महामारीविषयी जनजागृती व्हावी आणि कोरोणाचे रुग्ण वाढू नये यासाठी राहाता तालुक्यातील खडकेवाके या खेड्यातील मंगल शिंदे या अंगणवाडी सेविका दोन्ही पायाने अपंग असूनही घरोघरी जावून सर्वेक्षणात सहभाग घेत आहे.
अपंग असातनाही वाडी, वस्तींवर भेट देतात
सध्या गावा गावात कोरोनाचे रुग्ण शोधण्याबरोबरच लसीकरणाबद्दल जनजागृती केली जात आहे. त्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. पथकाकडून रखरखत्या उन्हात दारोदारी वाडी, वसत्यांवर जात नागरिकांकडून माहिती गोळा करण्याचे काम करण्यात येत असून दररोज 50 घरांना भेटी देत माहिती घेतली जात आहे. खडकेवाके येथील मंगल शिंदे यांनी आपले गाव आपलच घर समजून अपंग असूनही कुठेही कमी न पडता स्वत:ला या कामात वाहून घेतले आहे. कधी आपल्या तीन चाकी सायकलवर, तर कधी अपंगांसाठी बनविण्यात आलेल्या मोपेडवरून वाडी, वस्तीवर जावून त्या भेट देत आहेत.
कोरोनाची लक्षणे तपासतात