महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amit Shah Visit Shirdi: अमित शाह यांनी साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन - Amit Shah Visit Shirdi

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी साईबाबांची पद्य पुजा आणि 'शिर्डी माझे पंढरपूर' ही छोटी आरती केली आहे. दरम्यान साईसंस्थानच्यावतीने शाह यांचा साईमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. शाह यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve visit Shirdi ) आणि भागवत कराड यांनी ( Bhagwat Karad visit Shirdi with Amit Shah ) साईबाबांचे दर्शन घेतले आहे.

अमित शाह यांनी साईबाबांच्या समाधीचे  घेतले दर्शन
अमित शाह यांनी साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन

By

Published : Dec 18, 2021, 6:42 PM IST

Updated : Dec 18, 2021, 7:03 PM IST

अहमदनगर -देशाचे पहिले सहकार मंत्री तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Home Minister visit Shirdi ) आज अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर दौऱ्यावर होते. या दौरादरम्यान अमित शाह यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन ( Amit Shah took Saibaba Darshan ) घेतले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी साईबाबांची पद्य पुजा आणि 'शिर्डी माझे पंढरपूर' ही छोटी आरती केली आहे. दरम्यान साईसंस्थानच्यावतीने शाह यांचा साईमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. शाह यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve visit Shirdi ) आणि भागवत कराड यांनी ( Bhagwat Karad visit Shirdi with Amit Shah ) साईबाबांचे दर्शन घेतले आहे.

हेही वाचा-Amit Shah On DCC Bank Scam : 'हजारो कोंटींचे घोटाळे कसे झाले?, रिझर्व्ह बॅंकेने केले का ?' - अमित शाह



प्रवरानगर येथील कार्यक्रमानंतर साईबाबांच्या समाधीचे दर्शन-
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणार होते. साई दर्शनानंतर प्रवरानगर येथे सहकार परिषेदेस उपस्थित राहणार होते. मात्र त्यांचे विमान शिर्डी विमानतळावर उशिरा आल्याने ते थेट प्रवरानगर येथे सहकार परिषेद कार्यक्रमाला रवाना झाले. प्रवरानगर येथील सहकार परिषेद कार्यक्रम झाल्यानंतर अमित शहा थेट शिर्डीत येवुन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांचा बरोबर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अन्य उपस्थित आहे.

साईबाबांची पद्य पुजा आणि 'शिर्डी माझे पंढरपूर' ही छोटी आरती

हेही वाचा-Amit Shah Maharashtra Visit : सहकार परिषद कार्यक्रमात अमित शाह म्हणाले...'प्रवरानगरची भूमी काशी जितकीच पवित्र'; वाचा प्रत्येक अपडेट्स

जिल्हा बँकामध्ये हजारो कोटींचा घोटाळा कुणी केला? अमित शाह यांचा सवाल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कार्यक्रमात म्हणाले, की नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सहकार मंत्रालय स्थापन ( cooperative Ministry under Amit Shah ) करण्यात आले. आज सहकार क्षेत्र अडचणीत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा बँक आदर्श मानल्या जात होत्या. आज फक्त तीन बँका आहेत. हजारो कोटींचा घोटाळा कुणी केला? रिझर्व्ह बँकेने केले का? असा सवाल अमित शाह यांनी केला. सहकारी बँकांच्या पाठिशी नरेंद्र मोदी आहेत, असेही अमित शाह म्हणाले.

Last Updated : Dec 18, 2021, 7:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details