अहमदनगर - जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी अखिलेश कुमार सिंह हे बदलून आले आहेत. अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील हे गेले काही महिने जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहत होते.
चार महिन्यांनी जिल्ह्याला मिळाले पोलीस अधीक्षक; अखिलेशकुमार सिंह यांची नियुक्ती
जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू हे बदलून गेल्यापासून पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार सागर पाटील हे पाहत होते. गेल्या चार महिन्यांपासून हे पद रिक्त होते. या पदावर आता मुंबई परिमंडळ सातमध्ये पोलीस उपायुक्त असलेले अखिलेश कुमार सिंह हे रुजू झाले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू हे बदलून गेल्यापासून पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार सागर पाटील हे पाहत होते. गेल्या चार महिन्यांपासून हे पद रिक्त होते. नव्याने बदलून आलेले अखिलेश कुमार सिंह हे मुंबई येथील परिमंडळ सातमध्ये पोलीस उपायुक्त होते. त्यांच्या बदलीचा आदेश राज्य शासनाचे उपसचिव कैलास गायकवाड यांच्या स्वाक्षरीने रात्री उशिरा काढण्यात आला. सिंह यांच्यासोबतच अभिषेक त्रिमुखे यांचीही बदली झाली आहे. ते सहायक महानिरीक्षक म्हणून कार्यभार पाहत होते. आता ते मुंबई शहराचे पोलीस उपायुक्त असतील. दोघांनाही तत्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाचे थैमान सुरू आहे. परदेशी नागरिकांमुळे जिल्ह्यातील लोकांना बाधा झाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशसानावर मोठ्या प्रमाणात ताण आला आहे. तर, पोलीस अधीक्षक पदाचा सागर पाटील यांनी आत्तापर्यंत सक्षमपणे जिल्ह्याचा कार्यभार सांभाळला.