महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू, पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद - विमानसेवा

शिर्डीतील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून सुरू झाले आहे. आज पहिल्याच दिवशी चेन्नईहून शिर्डी येथे आलेल्या विमानातून 168 प्रवासी आले आहे तर शिर्डीहून चेन्नईसाठी 38 प्रवासी गेले आहेत. साई मंदिर सुरू झाल्यानंतर विमानतळही सुरू झाल्याने साई भक्तांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

विमानतळ
विमानतळ

By

Published : Oct 10, 2021, 8:22 PM IST

अहमदनगर -शिर्डीतील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून सुरू झाले आहे. आज पहिल्याच दिवशी चेन्नईहून शिर्डी येथे आलेल्या विमानातून 168 प्रवासी आले आहे तर शिर्डीहून चेन्नईसाठी 38 प्रवासी गेले आहेत. साई मंदिर सुरू झाल्यानंतर विमानतळही सुरू झाल्याने साई भक्तांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू, पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

टाळेबंदीपासून बंद होते विमानतळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह संपूर्ण देशात टाळेबंदी करण्यात आली होती. तेव्हापासून विमानतळ बंद होते. त्यामुळे विमानतळावर अवलंबून असलेल्या व्यवसायिकांवरही उपासमारीची वेळ आली होती. आजपासून विमानतळ सुरू झाल्याने विमानतळावर अवलंबून असलेल्या व्यवसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

टॅक्सी संघटनेने केले प्रवाशांचे स्वागत

टाळेबंदीपासून विमानतळ बंद असल्याने विमान प्रवाशांवर अवलंबून असेलेला टॅक्सी व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. अनेकांना आर्थिक अडचणींचा तोंड द्यावे लागत होते. कर्ज काढून घेतलेल्या वाहनांचे हप्ते फेडणेही त्यांना कठिण झाले होते. आता साई मंदिरासह विमानतळ सुरू झाल्याने प्रवासी व साई भक्तांचे येणे-जाणे सुरू होणार असून व्यवसाय व संसाराचा गाडा ओढणे सोपे जाणार आहे. त्यामुळे आनंदित झालेल्या टॅक्सी संघटना व काकडी ग्रामपंचायतीच्या वतीने चेन्नईहून विमानाने शिर्डीत आलेल्या प्रत्येक प्रवाशाचे शाल व पेढे देऊन स्वागत केले.

दिल्ली व हैदराबादहून शिर्डीसाठी सुरू होणार विमानसेवा

12 ऑक्टोबरपासून दिल्ली ते शिर्डी तसेच हैदराबाद ते शिर्डी विमानसेवाही सुरू होणार आहे. येत्या काही दिवसात पुन्हा शिर्डी विमानतळ पूर्वीप्रमाणे पूर्ण क्षमतेने सुरू होईल, अशी माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक सुशील श्रीवास्तव यांनी दिली आहे.

हेही वाचा -डिटोनेरचा वापर करत फोडले एटीएम; लाखो रुपयांची रोकड लंपास

ABOUT THE AUTHOR

...view details