अहमदनगर- नगर जिल्ह्याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार समजले जाते. औरंगाबाद, बीडसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी अहमदनगर जिल्हातील मार्ग महत्त्वाचा समजला जातो. त्यामुळे नगर-बीड-परळी या महत्वकांक्षी रेल्वे मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. नगर ते नारायणडोह या २५ किलोमीटर मार्गाच्या यशस्वी चाचणीनंतर नारायण डोह ते आष्टी (जि-बीड) तालुक्यातील सोलापूरवाडी या २३ किलोमीटर रेल्वेमार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातून बीड परळी हा रेल्वेमार्ग एक महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. पुढे हाच मार्ग अहमदनगर मार्गे माळशेज रेल्वे या नावाने कल्याणकडे मार्गस्थ करावा, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. हा संपूर्ण मार्ग झाल्यास बीड, नगर, पुणे आणि कल्याण, असा सोईचा मार्ग तयार होणार आहे. सध्या नगरपासून बीड ते परळी या मार्गाचे काम सुरू आहे. पहिल्या २५ किलोमीटरच्या नगर-नारायणडोह मार्गानंतर नारायणडोह ते सोलापूरवाडी हा २३ किलोमीटर मार्ग पूर्ण करण्यात आला आहे.