अहमदनगर - आशा सेविकांनी मंगळवारी एकत्र येत जिल्हापरिषद कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. यात मानधनवाढीची प्रमुख मागणी होती. 'आम्ही मागतो कष्टाचं नाही कुणाच्या बापाचं', 'दहा हजार रुपये मानधन मिळालेच पाहिजे' अशा घोषणा देत यावेळी संपूर्ण जिल्हापरिषद कार्यालय आशा सेविकांनी दणाणून सोडले. हे आंदोलन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
हेही वाचा - जळगाव घरकुल घोटाळ्याचे तपास अधिकारी सिंधू यांचे अण्णांकडून अभिनंदन
ग्रामीण भागातील आरोग्यसेवेत मोठी भूमिका बजावणाऱ्या आरोग्यसेविकेंच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची भावना राज्यभरात आहे. मानधन वाढीचा प्रश्न गेले अनेक महिने रेंगाळत असून संप आणि आंदोलन झाल्यानंतर सरकार आश्वासन देण्यापलीकडे काहीच करत नसल्याचे आंदोलनकर्त्या सेविका म्हणत होत्या. त्यामुळे यापुढे आश्वासन नको तर निर्णय हवा अशी मागणी सेविकांनी केली.