(शिर्डी) अहमदनगर - पुणे येथील पत्नीस भेटून आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील नायब तहसीलदाराला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रथम हे तहसीलदार एका खासगी रुग्णालयात उपचाराकरता गेले. तेथील डॉक्टरांनी ही माहिती सरकारी रुग्णालयातील डॉक्टारांना दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
पुण्यातून पत्नीस भेटून आलेल्या संगमनेरमधील तहसीलदारास कोरोनाची लागण - pune return tehsildar corona positive news
ते संगमनेराला आले असता त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांनी एका खासगी रुग्णालयात तपासणी केली. दरम्यानच्या काळात ते चार दिवस कार्यायलयात आले नाहीत. दिनांक 7 जुन रोजी त्यांना जास्तच त्रास होऊ लागल्यानंतर त्यांनी एका खासगी रूग्णालयात कोरोनाची तपासणी केली, त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
![पुण्यातून पत्नीस भेटून आलेल्या संगमनेरमधील तहसीलदारास कोरोनाची लागण ahmednagar tehsildar went to meet his wife in pune was found corona positive](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7542162-295-7542162-1591697072951.jpg)
या घटनेची मिळालेली सविस्तर माहिती अशी, की संगमनेर तालुक्यातील निवासी नायब तहसीलदार हे विनापरवाना पत्नीस भेटण्यासाठी पुण्याला गेले होते. ते संगमनेराला आले असता त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांनी एका खासगी रुग्णालयात तपासणी केली. दरम्यानच्या काळात ते चार दिवस कार्यायलयात आले नाहीत. दिनांक 7 जुन रोजी त्यांना जास्तच त्रास होऊ लागल्यानंतर त्यांनी एका खासगी रूग्णालयात कोरोनाची तपासणी केली, त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्या पत्नीची तपासणी केली असता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सध्या या अधिकाऱ्यावर पुणे येथे उपचार सुरू आहे.
TAGGED:
shirdi corona update news