महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना काळात प्रशासन कमी पडल्याने स्वयंसेवी संस्था महासंघाचे सत्याग्रह आंदोलन - स्वंयसेवी संस्थांचे आंदोलन

कोरोना परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत स्थापित केलेल्या स्वयंसेवी संस्था महासंघाच्या वतीने हातात तिरंगा फडकवत आणि मोबाईलची टॉर्च पेटवून सत्याग्रह आंदोलन केले

social organization protest
social organization protest

By

Published : Apr 17, 2021, 5:02 PM IST

Updated : Apr 17, 2021, 5:11 PM IST

अहमदनगर -कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या वेगाने वाढत असताना जिल्हा प्रशासन कोणत्याही गोष्टीचे अजूनही पुरेसे नियोजन करू न शकल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची ससे होलपट असल्याचा निषेध म्हणून आणि प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत स्थापित केलेल्या स्वयंसेवी संस्था महासंघाच्या वतीने हातात तिरंगा फडकवत आणि मोबाईलची टॉर्च पेटवून सत्याग्रह आंदोलन केले.

रुग्णांना कधी दिलासा मिळणार-

यावेळी बोलताना स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी जिल्ह्यात कोरोनामुळे हाहाकार उडाल्याची परस्थिती असताना प्रशासन यावर काहीच उपाययोजना करताना दिसून येत नसल्याचे सांगितले. रुग्णांना तपासणीपासून बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर पर्यंत धावपळ करावी लागत आहे. रुग्ण मृत्यूची संख्या वाढली आहे, तिथेही अंत्यविधीसाठी रांग लागली आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर रुग्ण वाढत असताना प्रशासनाने नियोजन केलेले नसल्यानेच आता ही परिस्थिती ओढावली आहे. आता तरी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना लवकर दिलासा मिळाला म्हणून हा सत्याग्रह असल्याचे डॉ. गिरीश कुलकर्णी म्हणाले.

स्वयंसेवी संस्था महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह
सत्याग्रहात विविध स्वयंसेवी संस्था सहभागी -

कोरोनाचे नियम पाळत मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी राहत संस्थेचे अजित माने, सुलक्षणा आहेर, राजीव गुजर, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे अ‌ॅड. श्याम असावा, स्नेहालयचे अनिल गावडे, झोपडपट्टी नागरिक संघचे हनिफ तांबोळी, स्वयंसेवी संघाचे अनिकेत कौर, दिशा फाउंडेशनचे दीपक पापडेजा, अनामप्रेमचे अजित कुलकर्णी सहभागी झाले होते. सत्याग्रहींनी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन निवेदन देत परस्थितीत त्वरित सुधारणा करण्याची मागणी केली.

Last Updated : Apr 17, 2021, 5:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details