अहमदनगर- मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक असताना कोण निवडून येणार याबद्दल मतदारांमध्ये मोठी उत्सुकता असतानाच दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची जय्यत आणि चोख तयारी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघाची मतमोजणी नगर शहराजवळील नागापूर येथील महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. गुरुवारी सकाळी ठीक ८ वाजल्यापासून या मतमोजणीला सुरवात होणार असून जिल्हा निवडणूक शाखेने मतमोजणीची पूर्ण तयारी केली आहे.
या तयारीच्या अनुषंगाने आज नियुक्त कर्मचाऱ्यांमार्फत रंगीत तालीम झाली. गुरुवारी प्रत्यक्षात होणाऱ्या मतमोजणीत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी प्रशासन पूर्ण काळजी घेताना दिसून येत आहे. शहरात एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदाम क्रमांक एकमध्ये अहमदनगर दक्षिण मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. गोदाम क्रमांक तीन मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होईल. मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. एकंदरीत पाहिले तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड असे हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.
या मतदार संघ निहाय मतदान केंद्र आणि त्यांच्या मतमोजणीच्या फेऱ्या याप्रमाणे-
शेवगाव 365 मतदान केंद्र आणि 26 मतदान फेऱ्या
राहुरी 308 मतदार संघ आणि 22 मतदान फेऱ्या
पारनेर 365 मतदान केंद्र आणि 26 फेऱ्या
अहमदनगर 292 मतदान केंद्र आणि 21 फेऱ्या
श्रीगोंदा 345 मतदान केंद्र आणि 25 फेऱ्या
कर्जत-जामखेड 355 मतदान केंद्र आणि 26 फेऱ्या
याप्रमाणे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकुण मतदार 18 लाख 54 हजार 248 असून प्रत्यक्ष झालेले मतदान 11 लाख 91 हजार 521 म्हणजे टक्केवारीत 64.26 आहे.
मतमोजणी यंत्रणा-
अहमदनगर मतदार संघ मतमोजणी नियोजन मतमोजणी कक्षांची संख्या सहा मतमोजणी टेबल 84 टपाली मतपत्रिका मतमोजणी केबल एक मतमोजणी पर्यवेक्षक 84, मतमोजणी सहाय्यक 84, सूक्ष्म निरीक्षक 84, आकडेवारी एकत्रीकरणासाठी कर्मचारी 12, रॉ ऑफिसर 6, सिलिंग स्टाफ 36, शिपाई 120
शिर्डी लोकसभा मतदार संघ-