महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

#Video: गणपती विसर्जन मिरवणुकीत मनसोक्त नाचले पोलीस! - police enjoying ganesha festival

अहमदनगर शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या नेतृत्वाखाली गणपती विसर्जन मिरवणूक निघाली होती.

गणपती विसर्जन मिरवणूकीत मनसोक्त नाचले पोलीस!

By

Published : Sep 8, 2019, 5:00 AM IST

Updated : Sep 8, 2019, 7:53 AM IST

अहमदनगर -गणेशोत्सवाच्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था सांभाळणारा पोलीस चक्क् गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत नाचताना पाहायला मिळत आहे. अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पारंपरिक वाद्यावर मिरवणूक काढली होती. यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व पोलीस निरीक्षक विकास वाघ हेही उपस्थित होते.

#Video: गणपती विसर्जन मिरवणूकीत मनसोक्त नाचले पोलीस!

हेही वाचा - डोंबिवलीत बाप्पासाठी साकारला 'चांद्रयान - 2'चा देखावा

शहर कोतवाली पोलिसांनी गणपती बाप्पाला शनिवारी निरोप दिला. कोतवाली पोलीस ठाण्यातून निघालेल्या वाजत गाजत मिरवणुकीत पोलीस कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या नेतृत्वाखाली ही विसर्जन मिरवणूक निघाली होती. खाकी वर्दी असलेल्या कर्मचाऱ्यांनी मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांवर वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांवर चांगलाच ठेका धरला होता. पोलिसांची ही गणेश विसर्जन मिरवणूक नगरकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

हेही वाचा - ठाणेकरांना वाहतुकीचे नियम सांगण्यासाठी बाप्पा अवतरले थेट रस्त्यावर

Last Updated : Sep 8, 2019, 7:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details