महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोदावरीला आलेल्या पुराने कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

गेल्या काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीला आलेल्या पुराने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने येथील शेतीची पाहणी करून पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

By

Published : Aug 16, 2019, 3:48 PM IST

गोदावरीच्या पुराने पुणतांबा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

अहमदनगर - जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीला पूर आला होता. तालुक्यातील पुणतांबा येथील नदी काठच्या शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

अहमदनगरमध्ये गोदावरी नदीला आलेल्या पुराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

काही दिवसांपूर्वी गोदावरी नदीला आलेल्या पुराने पुणतांबा येथे नदी काठच्या शेतकऱ्यांची दोनशे ते आडीचशे हेक्टर शेती पाण्याखाली गेली होती. गोदावरी नदीचे पाणी पुणतांबा, शिर्डी रस्त्यावरील 'कात नाला' भागापर्यंत आले होते. यामुळे या परिसरातील सोयाबीन, मका, ज्वारी अशी अनेक पिके पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

कात नाला परिसरातील बनकर वस्ती येथाल जेजुरकर या शेतकाऱ्याच्या शेतीतील 5 एकर सोयाबीन पाणी खाली गेल्याने संपूर्ण सोयबीन हातातून गेले आहे. या संदर्भात जेजुरकर यांनी कृषि विभागाशी संपर्क केला नंतर कॄषी विभागाच्या अधिकारी याठिकाणी फक्त पाहणी करून गेले. त्यांनी पंचनामा केला नसल्याचे शेतकऱ्यांनाकडून सांगण्यात येत आहे. तेव्हा कृषि अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सर्व नुकसानीचे पंचनामे करून शासनाला सादर करावेत आणि शेतकऱ्यांना मदत करावी, ही मागणी शेतकऱ्यांनाकडून होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details