महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीज माता रहिबाई पोपरे यांच्या हस्ते शिर्डीतील क्रांती मंडळाच्या गणपतीची आरती - अहमदनगर शिर्डी क्रांती मंडळ

शिर्डीतील क्रांती मंडळाच्या गणपतीची पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त बीज माता रहिबाई पोपरे यांच्या हस्ते मंडळाच्या गणपतीची आरती करण्यात आली.

शिर्डीतील क्रांती मंडळाच्या गणपतीची पारंपारिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणूक

By

Published : Sep 12, 2019, 8:58 PM IST

Updated : Sep 12, 2019, 10:24 PM IST

अहमदनगर - शिर्डीतील 28 वर्षे जुने असलेल्या क्रांती मंडळाच्या गणपतीची गुरुवारी पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लाडक्या बाप्पाला पालखीत बसवण्यात आले होते.

शिर्डीतील क्रांती मंडळाच्या गणपतीची पारंपारिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणूक, बीज माता रहिबाई पोपरे यांच्या हस्ते गणपतीची आरती

हेही वाचा... परदेशातही बाप्पाची धूम, बहरीन देशात गणेश विसर्जन उत्साहात

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त बीज माता रहिबाई पोपरे यांचा सत्कार

शिर्डीतील क्रांती मंडळ हे 28 वर्षे जुने मंडळ असून शहरातील सामाजिक उपक्रम करण्यात अग्रेसर असलेल्या मंडळात याचा समावेश होतो. या वर्षीही नहेमी प्रमाणे गणेशाची पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. पालखीत गणपती बाप्पा, समोर गणेश भक्तांच्या हातात ढोल आणि डोक्यावर भगवा फेटा असे सुंदर दृष्य यावेळी दिसत होते. अतिशय सुंदर आणि शांततेत क्रांती मंडळाने गणपतीची मिरवणूक काढली. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त बीज माता रहिबाई पोपरे यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. तसेच मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.

हेही वाचा... धुळ्यातील मानाच्या खुनी गणपतीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

Last Updated : Sep 12, 2019, 10:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details