महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर-पालिका रुग्णालय परिसरातच गांधी स्वच्छता अभियानाचे तीन तेरा

अहमदनगरच्या मुकुंदनगर उपनगरातील महानगरपालिकेच्या रुग्णालयाजवळ कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून यासाठी कचरापेटी उपलब्ध नाही, ना पालिकेची घंटा गाडी येथे कचरा उचलण्यास येते. महानगरपालिकेने या परिसरातील स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष केले असल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे.

स्वच्छता अभियान

By

Published : Sep 5, 2019, 10:23 PM IST

अहमदनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 ला गांधी जयंतीनिमित्त भारत स्वच्छता अभियानाचा संकल्प हाती घेतला. हे अभियान देशव्यापी चळवळ व्हावी आणि 2 ऑक्टोबर 2019 ला महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीपर्यंत संपूर्ण देश स्वच्छ व्हावा ही अपेक्षा पंतप्रधान मोदींची आहे. मात्र, आता जयंतीला अवघा एक महिना बाकी असताना अनेक शहरांमध्ये स्वच्छतेची बोंब असून मुळात या अभियानाची थट्टा उडवण्यात आल्याचे दिसून येत आहे.

महापालिका रुग्णालयाच्या सुरक्षाभिंतीजवळ पसरलेला कचरा


एकीकडे संपूर्ण देशात स्वच्छता अभियान राबविले जात असताना काही शहरात या अभियानाची थट्टा उडविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. अशीच काहीशी परिस्थिती अहमदनगरच्या मुकुंदनगर उपनगरातील महानगरपालिकेच्या रुग्णालयाजवळही दिसून येते. या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून यासाठी कचरापेटी उपलब्ध नाही, ना पालिकेची घंटा गाडी येथे कचरा उचलण्यास येते.

स्वच्छ भारत अभियान आणि शहरात पसरलेले कचऱ्याचे साम्राज्य


येथील स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की महानगरपालिकेने या परिसरातील स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष केलेले आहे. हे पालिकेचे रुग्णालय असूनसुद्धा या रुग्णालयाच्या सुरक्षा भिंतीजवळच नागरिक कचरा टाकत असून येथे घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने येथील आरोग्य व्यवस्थाच धोक्यात आली आहे. या प्रकरणी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांनी तसेच परिसरातील नागरिकांनी पालिकेच्या या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त केला आहे.

येथील कचरा साफ न केल्यास आम्ही आंदोलन करू, तसेच पालिकेने हा कचरा उचलण्यास दिरंगाई केली तर पालिका कार्यालयात हा कचरा आणून टाकू, मुकुंदनगर येथील रहिवाशांच्यावतीने पालिकेला असा इशारा देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details