महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर - महापौर पदावरून आघाडीमध्येच वर्चस्वाची लढाई - राष्ट्रवादी काॅंग्रेस

अहमदनगर येथील सेना-राष्ट्रवादीतील वर्षानुवर्षेचा वाद सर्वश्रुत आहे. त्यात माजी आमदार अनिल राठोड यांच्या निधनाने शिवसेनेतील दोन गटात पक्षांतर्गत स्पर्धा आहे. काँग्रेस केवळ पाच नगरसेवकांवर सीमित आहे. पुढील अडीच वर्षासाठी अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित असताना भाजपकडे या प्रवर्गातून उमेदवारच नाही. मविआच्या सेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षामध्ये या पदासाठी स्पर्धा असून राज्य पातळीवर काय निर्णय होतो. हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

ahmednagar meyor election politics
महापौर पदावरून आघाडीमध्येच वर्चस्वाची लढाई

By

Published : Jun 5, 2021, 12:50 PM IST

अहमदनगर -नगर शहरवर्ती एकहाती सत्ता राहण्यासाठी महापौर पद आपल्याकडे असावे. हे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटणे स्वाभाविक आहे. २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हे पद आपल्याच ताब्यात असावे, यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस पूर्ण ताकदीनिशी प्रयत्नशील आहे. महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक असल्याने महाविकास आघाडीचा धर्म पाळून हे पद शिवसेनेला मिळणार का हा मुख्य प्रश्न आहे.

राष्ट्रवादीकडेका जाऊ शकते पद-

नगर शहरात राष्ट्रवादी पक्षाचे संग्राम जगताप हे आमदार आहेत. सेना-राष्ट्रवादीतील वर्षानुवर्षेची सुंदोपसुंदी सर्वश्रुत आहे. त्यात माजी आमदार अनिल राठोड यांच्या निधनाने शिवसेनेतील दोन गटात पक्षांतर्गत स्पर्धा आहे. काँग्रेस केवळ पाच नगरसेवकांवर सीमित आहे. पुढील अडीच वर्षासाठी अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित असताना भाजपकडे या प्रवर्गातून उमेदवारच नाही. मविआच्या सेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षामध्ये या पदासाठी स्पर्धा असून राज्य पातळीवर काय निर्णय होतो. तो निर्णय आमदार जगताप यांना मान्य असेल का? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मात्र आमदार जगतापांचे शहरावर असलेले एकहाती वर्चस्व, सर्व पक्षात असलेला दबदबा आणि त्यांना २०२४ ची विधानसभा सोयीची असावी, यामुळे हे पद राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता अधिक आहे.

भाजपचे विद्यमान महापौर हे होते राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर -

२०१८ मध्ये झालेल्या मनपा सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेकडे जास्त नगरसेवक असतानाही भाजपने सेनेला बाजूला ठेवले. राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा देत भाजपचा महापौर-उपमहापौर झाला. स्थानिक राष्ट्रवादीच्या या भूमिकेने राज्यभर मोठी चर्चा झाली होती. त्यावेळी राज्य पक्ष नेतृत्वाने राष्ट्रवादीचे सर्व एकोणावीस नगरसेवक निलंबित केले होते. मात्र काही महिन्यात २०१९ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा हे नगरसेवक पक्षाने सामावून घेतले. यासर्व प्रक्रियेत आमदार संग्राम जगताप होते.

शिवसेनेला आता तरी संधी मिळणार का? -

मागील वेळी महापौर पदाने शिवसेना पक्षाला हुलकावणी दिली. शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपला मदत केल्याने भाजपचा महापौर आणि उपमहापौर झाला. तर शिवसेनेला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. साधे विरोधीपक्ष नेतेपदही त्यांना मिळू शकले नाही. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर आता परिस्थिती बदलली आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. स्थानिक पातळीवर नेत्यांनी एकजुटीने प्रयत्न केल्यास हे पद शिवसेनेला मिळवणे शक्य आहे. मात्र स्थानिक शिवसेना पक्षांतर्गत परिस्थिती तशी नाही. शहर शिवसेनेत दोन गट आहेत. दोन्ही गटांकडे ही उमेदवार आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत सध्या स्पर्धा दिसून येते. दोन्ही गटांच्या अंतर्गतवाद त्यामुळे आपल्याला नाही तर दुसऱ्यालाही नको अशी वेळ येऊ शकते. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल अशी चिन्हे आहेत. शिवसेनेचे जिल्ह्यातील मंत्री शंकरराव गडाख आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे यात काय भूमिका घेतात यावर सेनेचे भवितव्य आहे.

सध्या महापालिकेतील राजकीय बलाबल -

महापालिकेत सध्या शिवसेनेचे २३, राष्ट्रवादीचे १८, भाजपचे १५, काँग्रेसचे पाच, बसपचे चार, समाजवादी पक्षाचा एक व अपक्ष एक असे एकूण नगरसेवक आहेत. एकूण ६७ नगरसेवक महापालिकेत आहेत. महापौर निवडीसाठी ३४ हा जादुई आकडा गाठावा लागणार आहे.

आमदार संग्राम आपली पकड सोडणार नाहीत -

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला यापूर्वी मदत केली आहे. सध्या भाजपची भूमिका गुलदस्त्यात असली तरी ऐनवेळी ते मदत करू शकतात. शिवाय काँग्रेसचे पाचपैकी काही नगरसेवक आमदार जगताप यांना मानणारे आहेत. सध्या आमदार संग्राम जगताप यांचे शहरावर वर्चस्व असल्याने इतर नगरसेवकही त्यांच्यापासून दूर जाऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आगामी विधानसभेचे गणित जुळवितांना आमदार जगताप महापौर पद इतर पक्षांकडे जाऊ देणार नाहीत.

महापौरपदाची माळ रुपाली पारगे गळ्यात पडेल? -

महापालिकेची सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी ते आवश्यक ते प्रयत्न करतील यात शंका नाही. त्यामुळे कितीही घडामोडी घडल्या तरी महापौर राष्ट्रवादीचा होईल अशीच शक्यता आहे. राष्ट्रवादीकडे एकमेव रुपाली पारगे या उमेदवार आहेत. त्यामुळे महापौरपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडेल अशी तरी सध्या परिस्थिती आहे.

असे आहेत संभाव्य उमेदवार-

  • राष्ट्रवादी काँग्रेस- रूपाली जोसेफ पारगे
  • शिवसेना- रोहिणी संजय शेंडगे, रिता शैलेश भाकरे, शांताबाई दामोदर शिंदे
  • काँग्रेस-शीला दीपक चव्हाण
  • भाजप-उमेदवार नाही

हेही वाचा - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता, अहमदनगर प्रशासन सज्ज; बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स समिती गठीत

ABOUT THE AUTHOR

...view details